देश

डिझेल टँकर पलटी झाला; मदत करण्याऐवजी लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड

धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर डिझेलचा टँकर भररस्त्यात पलटी झाला. डिझेलचा टँकर पलटी झाल्याने संपूर्ण डिझेल रस्त्यावर सांडले होते. हे डिझेल पाहूण रस्त्यावरील नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली. पलटी झालेल्या डिझेलच्या टँकरमधून पडणारे डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. मिळेल त्या भांड्यात आणि कॅनमध्ये परिसरातील नागरिकांनी डिझेल भरून नेण्यास सुरुवात केली.

गुजरातहून चंद्रपूरच्या दिशेने जात असताना मुंबई आग्रा महामार्गावर डिझेलने भरलेल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मुंबई आग्रा महामार्गावर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा डिझेल टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत टँकर चालक गंभीर जखमी झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच उपस्थित नागरिकांना बाजूला करत मोठी दुर्घटना टाळण्यासाठी आपले कार्य सुरु केले आहे.

सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईने त्रस्त झालेल्या काही नागरिकांनी हे डिझेल मिळेल त्या भांड्यात भरण्यास सुरुवात केली आहे. याचे काही व्हिडिओ देखील समोर आलेत. सध्या हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Related Articles

Back to top button