देश

मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक करत मागितली ‘ही’ मदत

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने कडबी चौक ते गोळीबार बांधण्यात येणाऱ्या उडान पुलाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून ते आभासी पद्धतीने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केलं. मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी गडकरींकडून जाहीर मदत देखील मागितली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘ नवीन रस्ते अनेक वर्षे टिकतील अशी टेक्नॉलॉजि द्यावी, मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींकडे जाहीररित्या मागितली मदत. तसेच पुढे मुख्यमंत्री म्हणाले की,’राजकीय अडथळे येऊ न देता आपण विकास करू. आपला सहकार्याचा मार्ग नॅरो गेज (narrow gauge) ऐवजी ब्रॉड गेजने पद्धतीने  व्हावा, असं देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

Related Articles

Back to top button