मुसळधार पावसात एक ते दीड किलोमीटर गुडघाभर पाण्यातून चालत अंत्ययात्रा

भोर तालुक्यातील बारे खुर्द गावातील,एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. गेल्या १० दिवसांपासून पुण्यातील भोर तालुक्यात मुसळधार पाऊसानं थैमान घातलं होतं. दोन दिवसापूर्वी बारे खुर्द गावातील ६८ वर्षीय साहेबराव बदक यांच हृदयविकाराच्या धक्क्यान निधन झालं. मात्र स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यानं, मुसळधार पावसात एक ते दीड किलोमीटर गुडघाभर पाण्यातून चालत त्यांची अंत्ययात्रा काढावी लागली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
याबाब प्रशासनाकडे वारंवार पाठपुरवठा करूनही रस्ता झाला नसल्यानं गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.पावसाळ्यात अंत्यविधीसाठी जाताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मृत्यू नंतरही यातना सहन कराव्या लागतं असल्याने परिसरातील नागरिकांकडून संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.