देश

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी

राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. (NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik arrives at the office of the Enforcement Directorate in Mumbai) आर्थिक गैरव्यवहार संबंधित चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मलिक ईडी कार्यालयात सकाळीच 7.30 वाजता पोहोचल्याची माहिती आहे. ईडीने नवाब मलिक यांना चौकशीसाठीचे समन्स पाठवले होते.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) बुधवारी मनी लॉन्ड्रिंग (money laundering case) प्रकरणात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले. दरम्यान, हे प्रकरण डॉन दाऊद इब्राहिम ( Dawood Ibrahim) याच्याशी जोडलेले आहे. त्यामुळे या चौकशीकडे लक्ष लागले आहे.

आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी हे नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना समन्स बजावले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी आणि जबाब नोंदवणार आहेत. मलिकांचे अंडर्वर्ल्डशी संबंध आहे का याची चौकशी होणार आहे. दाऊदवर एनआयएने गुन्हा नोंदवल्यानंतर ईडी चौकशीला वेग आला आहे. दाऊदच्या साथादारांच्या घरांवर ईडीचे छापे मारण्यात आले होते. दरम्यान, दाऊदच्या भावाचीही ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button