
‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालानं वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तिच्या अचानक झालेल्या या निधनानं तिचा नवरा पराह त्यागीला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत राहत्या घरी तिनं अखेरचा श्वास घेतला. शेफालीला तिच्या नवऱ्यानं आणि कुटुंबातील लोकांना रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आलं. या सगळ्यात आता परागटी अखेरची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होतो. जेव्हा शेफालीचं निधन झालं तेव्हा तो कुठे होता आणि काय करत होता.
पत्रकार विकी लालवानीनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेफाली जरीवालाच्या निधनाची बातमी दिली आहे. ‘ईटाइम्स’ च्या रिपोर्ट्सनुसार, शेफालीला कार्डिएक अरेस्ट आला होता. त्यामुळेच तिचं निधन झालं. त्यामुळे सगळ्यांचा धक्का बसला की नेमकं हे कसं झालं. पराग त्यागी आणि तीन इतर लोकं शेफाली जरीवालाचं पार्थीव घेऊन रुग्णालयात गेले होते. पण त्यांना तिचं निधन झालं आहे चाही कल्पना नव्हती. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आणि तिथूनच तिचं पार्थीव हे कूपर रुग्णालयात पाठवण्यात आलं. खरंतर, तिच्या निधनाच्या आधी शेफाली काय करत होती आणि ती कुठे होती त्याची काही माहिती मिळालेली नाही. पण तिचा नवरा परागनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 7 तास आधी त्यानं एक मिरर सेल्फी शेअर केली होती. हा मिरर सेल्फी त्याच्या जीममधला होता. या फोटोत तो त्याचे बायसेप्स फ्लॉन्ट करताना दिसतोय. त्याच्या काही तासांनंतर तो त्याच्या पत्नीला घेऊन रुग्णालयाच्या बाहेर दिसला.
शेफाली जरीवालाच्या घरी पोलीस पोहोचली. फॉरेन्सिक टीम देखील संपूर्ण घराचा तपास घेत आहे. इंटरनेटवर काही व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. ज्यात शेफालीची आई रडताना दिसते. तर त्या मुलीला अखेरचं पाहण्यासाठी जात आहेत. तर शेफालीच्या निधनानं सगळ्यांना धक्का बसला आहे. कोणाचा यावर विश्वास नाही की शेफालीचं इतक्या कमी वयात निधन होईल.
दरम्यान, ‘काँटा लगा’ या गाण्यामुळे शेफाली एका रात्रीत यशाच्या शिखरावर पोहोचली होती. त्यानंतर तिच्या कामासोबत तिचं खासगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे.