देश

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ‘ही’ गोष्टी केल्यास तुम्ही स्लीपर तिकिटावर करु शकता सेकंड एसीने प्रवास

भारतात रेल्वेने असंख्य लोक दररोज प्रवास करतात. भारतातील छोट्यातील छोटे गाव हे रेल्वेने जोडले गेले आहे. स्वस्त आणि जलद प्रवाशासाठी भारतीयांची रेल्वेला पसंती आहे. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदीची बातमी आहे. यापुढे रेल्वेचे तिकीट काढताना एक पर्याय निवडून तिकीट काढल्यास तुम्ही स्लीपर तिकिटावर सेकंड एसीमध्ये प्रवास करु शकता. कसं ते जाणून घ्या. तुम्हाला तिकीट काढताना अपग्रेडेशनचा पर्याय निवडायचा आहे. बस येवढं करायचं आहे. त्यानंतर प्रवाशांना च्या बुक केलेल्या तिकिटांवर दोन उच्च श्रेणींमध्ये अपग्रेड करण्याचा लाभ मिळेल. बसण्याच्या आणि स्लीपर क्लासेससाठी स्वतंत्र अपग्रेड लागू असतील. (Good news for railway passengers If you choose the upgrade option you can travel in Second AC on sleeper ticket)

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे अपग्रेडेशन सिस्टीममध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. सर्व श्रेणीतील रिक्त जागा अपग्रेडेशनसाठी खुल्या केल्या जातील. सध्याच्या बुकिंगसाठी प्रत्येक श्रेणीतील किमान जागा ब्लॉक न करता सर्व रिक्त जागा अपग्रेडेशनसाठी वापरल्या जातील. रेल्वे बोर्डाचे संचालक प्रवासी विपणन संजय मनोचा यांनी सर्व झोनच्या प्रमुख मुख्य व्यावसायिक व्यवस्थापकांना यासंबंधी एक पत्र जारी केलंय.

फक्त दुसऱ्या एसीची तिकिटे पहिल्या एसीमध्ये अपग्रेड केली जातील, तिसऱ्या एसीमध्ये नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. फर्स्ट एसीमध्ये अपग्रेड करण्यासाठी दोन उच्च वर्गांमध्ये अपग्रेड करण्याची तरतूद लागू होणार नाही. थर्ड एसी तिकिटावर तुम्ही सेकंड एसीमध्ये अपग्रेड करण्याचा फायदा घेऊ शकता. फर्स्ट एसीमध्ये अपग्रेडेशन फक्त सेकंड एसी तिकिटं असलेल्या प्रवाशांनाच उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे, प्रवाशांना एसी चेअर तिकिटावर एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये अपग्रेड करण्याचा लाभ घेता येईल.

ज्या ज्येष्ठ नागरिकांना खालच्या बर्थने बसवले आहे त्यांना त्यांचे तिकीट अपग्रेड करण्यापूर्वी एक एसएमएस मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पसंतीनुसार अपग्रेडेशनची सुविधा दिली जाईल. जर तिकीट बुकिंग दरम्यान त्यांना खालचा बर्थ देण्यात आला असेल आणि त्यांनी अपग्रेडेशनचा पर्याय निवडला असेल, तर अपग्रेडेशनपूर्वी त्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस येईल.

तुमचे तिकीट उच्च श्रेणीत अपग्रेड केले जाईल असे तुम्हाला एसएमएसद्वारे कळवले जाईल. पण तुम्हाला खालचा बर्थ मिळेल की नाही याची खात्री नाही. त्यांच्या मंजुरीनंतरच अपग्रेडेशनची अंमलबजावणी केली जाईल. सवलतीच्या तिकिटांवर अपग्रेडेशनची सुविधा नसेल. खालच्या वर्गातून उच्च वर्गात अपग्रेड करण्याचा फायदा फक्त त्या प्रवाशांनाच मिळेल ज्यांनी पूर्ण भाडे देऊन तिकिटे बुक केली आहेत. कोणत्याही प्रकारच्या सवलतीच्या तिकिटांवर अपग्रेडेशन वैध राहणार नाही.

Related Articles

Back to top button