जिरेटोप घातला आता पीए मोदींना सिंहासनावरही बसवणार का? हिंदू महासेभेचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना घातलेला जिरेटोप (Jiretop) प्रफुल्ल पटेलांच्या (Praful Patel) चांगलाच अंगलट आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप देऊन पंतप्रधानांचं स्वागत केल्यानं महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यायत. प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही कृती महाराजांचा अवमान करणारी आहे असा हल्लाबोल आता हिंदू महासभेने (Hindu Mahsabha) केलाय. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ही लाचारी कुठून आली असा प्रश्नही हिंदू महासभेच्या आनंद दवेंनी उपस्थित केलाय. उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का असा संतप्त सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केलाय.
तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा राजकीय नेत्यांनी अवमान करू नये असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय. कोणत्याही कपड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालणं ही न शोभणारी गोष्ट आहे. पंतप्रधान महोदय छत्रपती नाहीत. प्रफुल पटेल तुम्हाला समजलं पाहिजे, छत्रपतींचा जिरेटोप कधी घातला जातो असा हल्लाबोल संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केला आहे.