ट्रेनमध्ये उर्दूत संभाषण ऐकलं, ‘मातोश्री’बाहेर घातपाताचा कट, नियंत्रण कक्षाला फोनवरुन दावा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला. या फोननंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने हा फोन केल्याची माहिती आहे. चार-पाच मुस्लीम व्यक्तींचे संभाषण कानावर पडले. त्यात आपण ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचं ऐकल्याचं फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं आहे.
त्याने नियंत्रण कक्षाला फोन करुन ही माहिती दिली. संबंधित मुस्लीम तरुण उर्दू भाषेतून हे संभाषण करत असल्याचा दावा फोन करणाऱ्या व्यक्तीने केला.
इतकंच नाही, तर संबंधित तरुण मोहम्मद अली रोड येथे रुम भाड्याने घेणार असल्याचा दावाही त्याने नियंत्रण कक्षाला केलेल्या फोनवर केला. या माहितीनंतर मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.