Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: 2018 च्या पक्ष घटनेची नोंदच नाही, 1999 चीच घटना ग्राह्य धरली जाणारः नार्वेकर

राज्याच्या राजकारणात अखेर तो महत्त्वाचा दिवस उजाडला असून, या दिवशी नेमक्या कोणत्या नाट्यमय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज्याच्या सत्तानाट्याचा निवाडा अखेर होणार आहे.
राज्यात उलथापालथ घडवणाऱ्या सत्तासंघर्षावर बुधवारी फैसला होणार असून, शिवसेना आमदार अपात्रतेता निकाल आज लागणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार की ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार याचा फैसला अवघ्या काही तासांमध्ये लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संध्याकाळी चार वाजता शिवसेना आमदार अपात्रता निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष करणार आहेत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष निकालाचे वाचन करतील. 500 पानांच्या निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेत ते निकाल वाचतील. निकालाची मुळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना नंतर दिली जाणार आहे.