देश

गणेश मूर्तिकारांवर BMCची करडी नजर

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेनं केलंय.. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये 60 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.. सातही धरणांमध्ये मिळून सध्या सुमारे 30 टक्के पाणीसाठा आहे.. मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा होता. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात फक्त 50 टक्के पाऊसच पडलाय.. तेव्हा 15 दिवसांत पाऊस न पडल्यानं मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जाऊ लागू शकतं.

मुंबईतील गणेश मूर्तिकारांवर बीएमसीची करडी नजर असणार आहे. घरगुती पीओपी गणेशमूर्ती घडवल्यास बीएमसी थेट न्यायालयात खटला दाखल करणार आहे. त्यासाठी महापालिकेनं भरारी पथकं तैनात केलीत. ही पथके ठिकठिकाणच्या गणेश कार्यशाळांची पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मूर्तिकारांची यादी तयार करणार आहे. पर्यावरणाचा -हास होत असल्यानं पीओपीच्या वापरावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातलीये.

Related Articles

Back to top button