देश
Ayodhya Ram Mandir: अमित शाह यांची मोठी घोषणा, ‘या’ तारखेला अयोध्येतलं राम मंदिर पूर्ण होणार

अयोध्येत (Ayodhya) उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराबाबत (Ram Mandir) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मोठी घोषणा केली आहे. मंदिर कधी पूर्ण होणार याची तारीख त्यांनी जाहीर केली आहे. संपूर्ण देशवासियांना उत्सुकता लागलेलं अयोध्येतील राम मंदिर 1 जानेवारी 2024 रोजी पूर्ण होणार आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही (Congress) निशाणा साधला. देश स्वातंत्र्य झाल्यापासून तेव्हापासून काँग्रेसने हा मुद्दा झुलवत ठेवला होता. पण आता मोदी (PM MOdi) पंतप्रधानपदावर आले राम मंदिराचा मुद्दा मार्गी लागला आणि त्याच दिवशी मंदिराचं बांधकाम सुरु झालं, आता 1 जानेवारी 2024 ला अयोध्येत राम मंदिर तयार होईल.