देश

Beed : मंत्रिपदावरून खदखद व्यक्त करताच मुंडे-सोळंके समर्थकांचा संघर्ष; अजितदादांच्या स्वागताच्या बॅनरवर एकमेकांना डावलले

काही दिवसांपूर्वी मंत्रपदावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ‘मंत्री पदासाठी जात आडवी येते’ असं म्हणत आपली खदखद बोलून दाखवली होती . त्यानंतर आता मुंडे आणि सोळंके गटात संघर्ष पाहायला मिळतोय . येता 7 तारखेला उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अजित दादांच्या स्वागताचे बॅनर बीडमध्ये झळकतायत . यावरूनच आता सोळंके आणि मुंडे गटात बॅनर वॉर सुरु झालंय . दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या बॅनरवर धनंजय मुंडे अन् प्रकाश सोळंकेंना डावललं आहे .

नेमकं झालं काय ?
येत्या ७ तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बीड जिल्हा दौरा आहे. याच अनुषंगाने अजितदादांच्या स्वागताचे बॅनर बीडमध्ये झळकतायत. मात्र धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून लावलेल्या बॅनरवर प्रकाश सोळंके यांना वगळण्यात आले, तर प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात वडवणीतील मुंडे पिता पुत्रांचा प्रवेश होतो. आणि याच साठी लागलेल्या बॅनरवर धनंजय मुंडे यांना स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागलीय. मंत्रीपदावरून आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष करत आपली खंत बोलून दाखवली होती. त्यानंतर आता मुंडे आणि सोळंके गटात संघर्ष पाहायला मिळतोय.

सोळंके आणि मुंडे गटात बॅनर वॉर
गेल्या पाच टर्म पासून आमदार असणारे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या गळ्यात काही वर्षांपासून मंत्रिपदाची माळ पडलेली नाही. आता त्यांनी मराठा समाजाचा असल्यामुळे मंत्रिपद मिळत नसल्याची भावना व्यक्त केली होती. “मला मंत्रीपद मिळत नाही, कारण माझी जात आडवी येते. बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव असल्याचे दिसते आहे. इथे बहुजन समाजाला स्थान द्यायचे नाही, अशी पक्षाची भूमिका असावी.’ असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली होती. त्यानंतर आता दोन्ही गटात कटुता अधिकच वाढली असून, तिचं पडसाद बॅनर वॉरच्या रूपाने उघडपणे दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार ७ ऑगस्ट रोजी बीड दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी बीडमध्ये विविध ठिकाणी पोस्टर आणि बॅनर लागले आहेत. मात्र, या बॅनरवरून एकमेकांना डावलण्याचे राजकारण सुरु झाले आहे. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर आमदार प्रकाश सोळंके यांचे फोटोच दिसत नाहीत. तर दुसरीकडे, प्रकाश सोळंके यांच्या गटाकडून वडवणीतील मुंडे पिता-पुत्रांचा पक्षप्रवेश दाखवणाऱ्या बॅनरवर खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांनाच डावलण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button