देश
तुळजाभवानीची तलवार गहाळ… मंदिरात अशी कोणती पूजा पार पडली ज्यानंतर खजिना खोलीतून तलवार गायब?

(TuljaBhavani Temple godess talwar) तुळजाभवानी मंदिरातील शस्त्र पूजनाची तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजा-यांनी केलाय. मंदिर संस्थांच्या खजाना खोलीत ही तलवार होती मात्र ती तलवार गायब झाली असून तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा दावा पुजाऱ्यांनी केला आहे.
तुळजाभवानीच्या आठ आयुधातील शास्त्राची तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून तलवार गायब केल्याचा या पुजा-यांचा आरोप आहे. मंदिरात सुरू असणा-या कामाला व्यत्य येऊ नये म्हणून पद्मश्री गणेश द्रविड यांच्या हस्ते मंदिरात विधीवत पूजा करण्यात आली होती. या पूजंद्वारे शस्त्रातील तत्त्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकल्यांचा आरोपही पुजाऱ्यांनी केला आहे. भक्तांना दर्शन घेण्यासाठी, गहाळ झालेली तलवार तुळजाभवानी देवीजवळ किंवा मंदिरात कुठेही ठेवावी अशी मागणी पुजाऱ्यांनी केली आहे.