AI मुळे ‘या’ 40 प्रोफाइलवरील लोकांच्या नोकऱ्या जाणार; सुरक्षित असलेले 40 जॉब्स कोणते? यादीच आली समोर

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर वाढल्याने नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होणार अशी चर्चा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. खरं तर एआयचा वापर वाढल्यापासूनच या तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी वाढणार अशी चर्चा आहे. मात्र आता मायक्रोसॉफ्ट रिसर्चच्या एका नवीन अभ्यासात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दृष्टीने नोकऱ्यांसंदर्भातील बाजाराचे मॅपिंग करण्यात आले आहे. या अभ्यासात एआय टूल्समुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या 40 नोकऱ्यांची यादी देण्यात आली आहे. यासोबतच या अभ्यासात अशा उद्योग, व्यवसायांची यादी देखील देण्यात आली आहे जे एआयचा वापर वाढल्यानंतरही आपलं महत्त्व कायम ठेवतील.
कसा करण्यात आला हा अभ्यास?
मायक्रोसॉफ्ट रिसर्चने ‘मायक्रोसॉफ्ट बिंग कोपायलट’सोबत 2 लाखांहून हून अधिक संवादांचे विश्लेषण या अभ्यास केले आहे. या अभ्यासात जनरेटीव्ही एआय कामाच्या ठिकाणी गतिमानता पुन्हा आकार देईल याचा दृष्टिकोन देण्यात आला आहे. “वर्किंग विथ एआय: मेजरिंग द ऑक्युपेशनल इम्प्लिकेशन्स ऑफ जनरेटिंग एआय” या मथळ्याखाली प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालामध्ये भाषा, सामग्री निर्मिती आणि पुन्हा पुन्हा एकाच प्रकारचा संवाद साधावा लागणाऱ्या नोकऱ्या या ‘एआय अॅप्लिकीबिलीटी स्कोअर’मध्ये अव्वल स्थानी आहेत. या नोकऱ्यांमध्ये माहितीची देवाण-घेवाण, लेखन, सल्ला देणे, शिकवणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. एआय चॅटबॉट्स ही सर्व कामे अगदी सहजपणे करण्यास सक्षम असल्याचं म्हटलं आहे.
AI मुळे जाऊ शकतील अशा 40 नोकऱ्या कोणत्या?
मायक्रोसॉफ्ट रिसर्चनुसार ज्या नोकऱ्या एआयच्या माध्यमातून सहज जातील अशा नोकऱ्यांची यादी खालीलप्रमाणे:
(Microsoft Research: List 40 jobs that AI may replace)
1. Interpreters and Translators
2. Passenger Attendants
3. Sales Representatives of Services
4. Writers and Authors
5. Customer Service Representatives
6. CNC Tool Programmers
7. Telephone Operators
8. Ticket Agents and Travel Clerks
9. Broadcast Announcers and Radio
10. Brokerage Clerks
11. Farm and Home Management Educators
12. Telemarketers
13. Concierges
14. Historians
15. Political Scientists
16. News Analysts, Reporters, Journalists
17. Mathematicians
18. Technical Writers
19. Proofreaders and Copy Markers
20. Hosts and Hostesses
21. Editors
22. Business Teachers, Postsecondary
23. Public Relations Specialists
24. Demonstrators and Product Promoters
25. Advertising Sales Agents
26. New Accounts Clerks
27. Statistical Assistants
28. Counter and Rental Clerks
29. Data Scientists
30. Personal Financial Advisors
31. Archivists
32. Economics Teachers, Postsecondary
33. Web Developers
34. Management Analysts
35. Geographers
36. Models
37. Market Research Analysts
38. Public Safety Telecommunicators
39. Switchboard Operators
40. Library Science Teachers, Postsecondary
AI मुळे जाणार नाहीत अशा 40 नोकऱ्या कोणत्या?
मायक्रोसॉफ्ट रिसर्चनुसार ज्या नोकऱ्या एआयचा वापर वाढल्यानंतरही सहज टिकून राहतील अशा प्रश्नांची यादी खालीलप्रमाणे:
(Microsoft Research: Lists 40 jobs that AI may replace)
1. Phlebotomists
2. Nursing Assistants
3. Hazardous Materials Removal Workers
4. Helpers–Painters, Plasterers, …
5. Embalmers
6. Plant and System Operators, All Other
7. Oral and Maxillofacial Surgeons
8. Automotive Glass Installers and Repairers
9. Ship Engineers
10. Tire Repairers and Changers
11. Prosthodontists
12. Helpers–Production Workers
13. Highway Maintenance Workers
14. Medical Equipment Preparers
15. Packaging and Filling Machine
16. Machine Feeders and Offbearers
17. Dishwashers
18. Cement Masons and Concrete Finishers
19. Supervisors of Firefighters
20. Industrial Truck and Tractor Operators
21. Ophthalmic Medical Technicians
22. Massage Therapists
23. Surgical Assistants
24. Tire Builders
25. Helpers–Roofers
26. Gas Compressor and Gas Pumping Station Op.
27. Roofers
28. Roustabouts, Oil and Gas
29. Maids and Housekeeping Cleaners
30. Paving, Surfacing, and Tamping Equipment Op.
31. Logging Equipment Operators
32. Motorboat Operators
33. Orderlies
34. Floor Sanders and Finishers
35. Pile Driver Operators
36. Rail-Track Laying and Maintenance Equip. Op
37. Foundry Mold and Coremakers
38. Water Treatment Plant and System Op.
39. Bridge and Lock Tenders
40. Dredge Operators
थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्यक्ष मजुरी आणि कष्टाची कामं करणाऱ्यांच्या नोकऱ्या एआयमुळे सहजपणे जाऊ शकत नाहीत, असं या अहवालामध्ये दिसून आलं आहे.