देश

महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव बदललं; सांगलीतील इस्लामपूर आता ईश्वरपूर!

राज्यामध्ये उस्मानाबाद अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांची नावे बदलण्यात आल्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव सुद्धा बदलण्यात आलं आहे. इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे. या संदर्भातील माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली. या बदलाचे स्वागत आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की इस्लामपूरचे ईश्वरपूर नाव करण्यात यावे अशी माहिती मागणी आम्ही केली होती. वाळवा तालुक्यातील नागरिकांनी सुद्धा मागणी नाव बदलण्यासंदर्भात केली होती. त्यामुळे ईश्वरपूरच्या लोकांचे मी अभिनंदन करतो, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button