देशमनोरंजन

Good News: सिद्धार्थ-कियाराच्या घरी लक्ष्मीचं आगमन, लग्नानंतर 2 वर्षांनी झाले आई-बाबा

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी नुकतेच आई-बाबा झाले आहेत. कियारा अडवाणीने मुलीला जन्म दिला आहे. सध्या या दोन्ही जोडप्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मंगळवारी या जोडप्याला कन्यारत्न प्राप्ती झाली. दोघांनी दिलेल्या या आनंदाच्या बातमीमुळे बॉलिवूडच्या कलाकारांनी देखील दोघांना शुभेच्छा आणि अभिनंदन केलं आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या दोघांनी फेब्रुवारीमध्ये सोशल मीडियावर गरोदरपणाची माहिती दिली होती.

कियारा-सिद्धार्थ यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर गोंडस लहान बाळाच्या मोज्यांचा फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. अशातच आता कियारा आणि सिद्धार्थ मंगळवारी आई-बाबा झाले. सिद्धार्थच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सेलिब्रिटी पापाराझीच्या अकाऊंटवरून पोस्ट शेअर

दरम्यान, सोशल मीडियावर सेलिब्रिटी पापाराझी अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आई-बाबा झाल्याचं म्हटलं आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दोघे मंगळवारी आई-बाबा झाले आहेत. त्यांना कन्यारत्न प्राप्ती झाली असून अलीकडेच सिद्धार्थ कियाराला रुग्णालयात घेऊन जाताना दिसला होता. त्याच्यासोबत त्याचे आणि कियाराचे कुटुंबीय देखील रुग्णालयात जाताना दिसले होते. त्यामुळे मंगळवारी ही आनंदाची बातमी आली. कियारा आणि तिची मुलगी दोघेही सुखरुप असल्याचे सांगण्यात आले आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या दोघांनीही याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. चाहते देखील दोघांच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. यासोबतच चाहते आता कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या मुलीचे नाव काय ठेवतात आणि तिची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

कियारा-सिद्धार्थ लग्न

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2023 मध्ये लग्न केलं. त्या दोघांच्या डेटिंगची सोशल मीडियावर देखील खूप चर्चा होती. दोघे 2020 पासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी राजस्थानमधील जैसलमेर येथे लग्न केले. त्यानंतर दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. यावेळी त्यांच्या लग्नाला काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते. अशातच आता दोघे आई-बाबा झाले आहेत.

Related Articles

Back to top button