Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त नेमका कोणता? वाचा पूजा, मुहूर्त आणि तिथी

हिंदू धर्मग्रंथानुसार, वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) म्हटलं जातं. या दिवशी सूर्य आणि चंद्र आपल्या उच्च राशीत स्थित असतात. अक्षय्यचा अर्थ कधीच क्षय न होणारा. या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसेच, सोन्याच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंची देखील खरेदी केली जाते. या दिवशी दान करण्याला देखील महत्त्व आहे. त्यानुसार, आज सोनं खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त नेमका कोणता आहे ते जाणून घेऊयात.
अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त (Akshaya Tritiya Shubh Muhurta 2025)
हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी सुरु झाली आहे. तर, या तिथीची समाप्ती 30 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी होणार आहे. उदय तिथीनुसार, अक्षय्य तृतीया 30 एप्रिल रोजी म्हणजेच आज साजरी केली जातेय. आज पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 41 मिनिटांपासून तसे दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत असणार आहे.
अक्षय्य तृतीयेला वस्तू खरेदीचा शुभ मुहूर्त
आजच्या दिवशी तुम्ही सकाळी 5 वाजून 41 मिनिटांपासून ते दुपारी 2 वाजून 12 मिनिटांपर्यंत सोनं खरेदी करु शकता. जर, तुम्ही सोनं खरेदी करु शकत नसाल तर तुम्ही सोन्याचं पाणी चढवलेल्या वस्तू, एखादा धातू पितळेची भांडी देखील खरेदी करु शकता.