देश

दोन्ही देवांच्या साक्षीने आज आम्ही पती- पत्नी झालो म्हणत पांढऱ्या शुभ्र साडीत सोनाक्षीने शेअर केले फोटो

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल 23 जूनला लग्नबंधनात अडकणार आहेत अशी चर्चा होती.या चर्च दरम्यान सोनाक्षी तिचा धर्म बदलणार की नाही, ती या दिवशी कोणता लुक कॅरी करणार असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले होते.नुकतेच सोनाक्षीने तिच्या सोशल मीडियावर तिच्या लग्नातील काही सोनेरी क्षण शेअर केले आहेत.
यामध्ये ती आयवरी रंगाच्या साडीमध्ये पाहायला मिळत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. काल पासून सोनक्षीच्या हळदीचे, आणि इतर कार्यक्रमाचे फोटो शेअर होत होते. या लुकमध्ये सोनक्षी अगदी परी सारखी भासत आहे. हे फोटो शेअर करत सोनाक्षीने कमेंट बॉक्स बंद ठेवला आहे. तिच्या या फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

​चिकनकारी वर्कची साडी

या सोनेरी दिवसासाठी सोनाक्षीने आयवरी रंगाची साडी नेसली आहे. या साडीवर बारिक नक्षी काढण्यात आली आहे. तिच्या या वरील नक्षी पाहून ही साडी तयार करण्यासाठी किती मेहनत लागली असेल याचा अंदाज येतोय.

सोनक्षीने अतिशय सिंपल पद्धतीने तिचा हा लुक कॅरी केला आहे. ही साडी तयार करण्यासाठी साधारणपणे २० दिवस तरी लागतात. तिच्या या लुकवरून कोणचीच नजर हटत नाही आहे. हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने फार काही न करता कमीत कमी दागिने कॅरी केले आहेत.

Related Articles

Back to top button