नाशिकमध्ये PM मोदींच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रचार सभा होत आहे. दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मोदींची सभा होत आहे. या सभेत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. शेककऱ्यांनी कांदाप्रश्नी चर्चा करण्याची मागणी केली.
मोदींच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी?
कांदा आंदोलकांची घोषणाबाजी मोदींच्या भाषणा दरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कांदा उत्पादकांनी पंतप्रधान मोदी यांना कांदा प्रश्नी बोलण्याची केली मागणी. यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांना बाहेर काढले.
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
– 10 वर्षात तुम्ही माझं काम बघितलं आहे.
– तिसरे वेळेसाठी तुमचे आशीर्वाद मागायला आलोय
– विकसित भारत करण्यासाठी मी आशीर्वाद मागतोय
– इंडी आघाडीतील लोकांच्या बोलण्यावरून लक्षात येतंय
– यातील मुख्य घटक काँग्रेस आहे ते अत्यंत वाईट पद्धतीने हरणार आहे
– विरोधी पक्ष सुद्धा बनणार नाही
– लहान लहान पक्षांना घेऊन सांगितले, निवडणूक झाल्यावर काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे सांगितले
– आपले शटर बंद करायचे ठरविले
– विरोधी पक्ष बनण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे.
– नकली शिवसेना, नकली एनसीपी यांचे काँग्रेसमध्ये विलानीकरन निश्चित आहे
– जेव्हा विलीन होईल तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येईल.
– जेव्हा वाटेल शिवसेना काँग्रेस झाली तेव्हा शिवसेना बंद करेल असे सांगितले होते.
– बाळासाहेब ठाकरे यांना सगळ्यात जास्त दुःख कधी होत असेल तर शिवसेना काँग्रेस सोबत गेली तेव्हा
– त्यांचे स्वप्न होते अयोध्येत राम मंदिर निर्माण करणे.
– जम्मू काश्मीर मध्ये 370 रद्द करणे हे स्वप्न.
– पण याची सगळ्यात संताप नकली शिवसेनेला होत आहे.
– प्राणप्रतिष्ठेला काँग्रेसने ठोकर मारली तीच वाट नकली शिवसेनेने घेतली.
– नकली शिवसेना एकदम चूप आहे, पापाची भागीदारी आहे
– पाप समोर आले आहे
– महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता हे पाहून संताप आभाळात जातो
– जनतेच्या भावनांची पर्वा काही वाटत नाही.
– नकली शिवसेनेला शिक्षा देण्याचे काम जनतेने ठरविले आहे
– 4 टप्प्यात झालेल्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव होईल.
– मोदी गरिबाला रेशन, घर, गॅस देत आहे.
– आम्ही यामध्ये धर्म जात विचारली नाही
– योजना सगळ्यांसाठी बनविल्या जातात.
– 140 कोटी लोकांच्या समोर आणू इच्छित आहे.
– काँग्रेसला असं वाटत जेवढे बजेट बनविले जातात त्यातील 15 टक्के अल्पसंख्याक जनतेला वाटायला पाहिजे.
– धर्माच्या नावावर पण बजेट मध्ये वाटा करत आहे
– मोदी चौकीदार आहेत
– आमची बहीण भारती पवार यांनी चांगल काम केले आहे.
– नाशिक जिल्ह्यातील गावात आयुष्यमान आरोग्य मंदिर बनविले
– 80 टक्के सूट देऊन औषधे बनविले जातात.
– आम्ही इमानदारीने काम केले
– मोदीने गॅरंटी दिले 70 वर्षाच्या वरील लोकांना 5 रुपये पर्यंत मोफत उपचार
– मोदींच पूर्ण लक्षण शेतकरी, तरुण, महिला आणि गरीब सक्षमीकरण हे आहे.
– काँग्रेस आणि एनसिपीचे सरकार पाहिले
– तेव्हा कृषिमंत्री महाराष्ट्राचे होते
– त्यांनी तुमची काही चिंता केली नाही
– पुढील 5 वर्षात 7 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार हे निश्चित
– काँग्रेसच्या काळात खोटे पॅकेज घोषित होत होते
– कांदा आणि द्राक्ष यासाठी नाशिक प्रसिद्ध
– आमचे सरकार आहे ज्यांनी पाहिल्यंदा बफर स्टोक केला
– मागील वर्षी 7 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला
– आता 5 लाख टन मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार
– काही दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदी उठवली
– आता 22 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे
– क्लस्टर निर्माण केल्यावर द्राक्ष उत्पादकांना फायदा होईल
– हेमंत गोडसे आणि भारती पवार यांना विजय करा
– मजबूत सरकार निर्माण करू भविष्य उज्ज्वल होईल
– ही गॅरंटी आहे