धर्मेंद्र यांची प्रकृती लक्षात घेत मोठा निर्णय
अभिनेते धर्मेंद्र यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. ऐकेकाळी चाहत्यांच्या मनात घर केलेल्या धर्मेंद्र यांच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. धर्मेंद्र लवकरच ‘अपने 2’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पण 85 वर्षीय धर्मेंद्र यांची प्रकृती लक्षात घेत चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय निर्मात्यांनी आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने घेतला आहे. चित्रपटात धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘अपने 2’ चित्रपट 2021मध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगत होती. पण कोरोना महामारीचं संकट लक्षात घते चित्रीकरण पुढे ढकलण्याचा निर्णय दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी घेतला आहे. टाईम्स ऑफ इंडिया दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटाचं चित्रीकरण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता धर्मेंद्र यांना पाहाण्यासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.