देश

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मतमोजणीत मोठे उलटफेर, महायुतीची 160 जागांवर आघाडी, तर महाविकास आघाडी…

आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. महाविकास आघाडी की महायुती कोणाला बहुमत मिळणार, याची उत्सुकता आहे.

विधानसभा निकालांत मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. महायुतीने मोठी मुसंडी मारली असून 160 जागांवर आघाडीवर आहे. तर, मविआ 100 जागांवर आघाडी आहे. तर अपक्ष व इतर लहान पक्षांनी 18 जागांवर आघाडी घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सरोज अहिरे यांची तिसऱ्या फेरी अखेर मोठी आघाडी. तर, शिंदे आणि ठाकरे पक्षाचे उमेदवार पिछाडीवर. 11,326 मतांनी सरोज अहिरे आघाडीवर

सरोज अहिरे – 17562
राजश्री आहेरराव – 6236
योगेश घोलप -4159

येवल्यात चौथ्या फेरीत छगन भुजबळांची 3,000 मतांची आघाडी. सुरुवातीच्या पिछाडीनंतर भुजबळ आघाडीवर तर शरद पवार पक्षाचे माणिकराव शिंदे पिछाडीवर

भाजप उमेदवार राजेश वानखेड 630 मतांनी आघाडीवर. यशोमती ठाकूर 630 मतांनी पिछाडीवर

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, कसबा या चार मतदारसंघात महायुती आघाडीवर

हडपसर मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे आघाडीवर

वडगाव शेरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आघाडीवर

पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये मात्र काँग्रेसचे रमेश बागवे आघाडीवर

खडकवासल्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडके आघाडीवर

Related Articles

Back to top button