देश

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजत असताना अनुराधा पौडवाल यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. दिल्लीतील भाजपा कार्यालयात दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. अनुराधा पौडवाल भाजपात अशावेळी दाखल झाल्या आहेत, जेव्हा देशात निवडणुकीचं वातावरण आहे. आज निवडणूक आयोग लोकसभा आणि चार राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करणार आहे.

कोण आहेत अनुराधा पौडवाल?
अनुराधा पौडवाल प्रसिद्ध गायिका आहे. 90 व्या दशकात बॉलिवूड तसंच भक्तीगीतांनी त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. त्या 69 वर्षांच्या आहेत. 1969 मध्ये अरुण पौडवाल यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. अरुण पौडवाल हे एस डी बर्मन यांचे असिस्टंट आणि संगीतकार होते. त्यांना आदित्य आणि कविता अशी दोन मुलं आहेत. आदित्यचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. तसंच 1991 मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं.

Related Articles

Back to top button