देश
BREAKING: मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण स्थगित, आता उद्यापासून…

मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. आता उद्यापासून साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. सोबतच, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असेही जरांगे यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे. मनोज जरांगे यांनी महिलांच्या हातून पाणी पिऊन उपोषण सोडले.
मनोज जरांगे आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहेत. लोकांना त्रास होऊ नये म्हणून मागे आलोय. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. कुणीही कितीही दबाव आणला तरी मागे हटणार नाही असं जरांगेंनी म्हटलं. अजूनही वेळ गेलेली नाही आज अधिवेशनात सगेसोयरेची अंमलबजावणी करा अशी विनंती जरांगेंनी केलीय. शिंदे, फडणवीसांनी मराठ्यांची नाराजी ओढावून घेऊ नये…मराठ्यांची नाराजी शिंदे, फडणवीसांना परवडणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला आहे.