जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी CBI ची छापेमारी

देशभरात सीबीआयने (CBI) 30 ठिकाणी छापे मारलेत. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक ( Satyapal Malik) यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे मारण्यात आलेत. मुंबईसह यूपी, बिहार, राजस्थान, हरियाणा इथे हे छापे मारण्यात आलेत. जम्मू काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी हे छापे मारण्यात आलेत. किश्तवाडमधील या प्रकल्पाच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला असा आरोप मलिक यांनी केला होता.
एएनआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार,जम्मू काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयची ही छापेमारी केली आहे. या प्रकल्पाच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला असा आरोप मलिक यांनी केला होता. किरू जलविद्युत परियोजना (624 मेगावाट), एक रन-ऑफ-रिवर योजना, जम्मू काश्मीरच्या किश्तवाडा जिल्ह्यात चिनाब नदीवर प्रस्तावित होणार आहे. प्रकल्पामध्ये प्रत्येकी 156 मेगावॅट क्षमतेच्या 4 युनिट्ससह 135 मीटर उंच धरण आणि भूमिगत वीजगृह बांधण्याची कल्पना आहे.