देश
Abhishek Ghosalkar Firing Case Live : महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लावा; ठाकरे गटाची मागणी

शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी मुंबईतील दहिसर परिसरात वैयक्तिक वादातून गोळ्या झाडण्यात आल्या. गंभीर अवस्थेत अभिषेक यांना बोरिवली येथील करुणा रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता.