देश

Budget 2024 LIVE Updates: गरीब, महिला, युवा आणि अन्नदात्यावर लक्ष; मध्यम वर्गाच्या घरांबद्दल अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 (आज) सादर करणार असून, हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प असणा आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी सादर केला जाणारा हा अंतरिम अर्थसंकल्प असून, त्यानंतर निवडणुकांचे निकाल आणि सत्तास्थापना पार पडल्यानंतर सविस्तर अर्थसंकल्प देशातील सरकारकडून सादर केला जाईल.

दरम्यान, बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच सविस्कर अर्थसंकल्प सादर केला जाईल असं म्हणताना पुन्हा एकदा मोदी सरकार असेच संकेत दिल्याचं पाहायला मिळालं. तूर्तास यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण मतदार, पगारदार आणि एकंदर सर्व घटकांना अंदाजात घेत अर्थसंकल्पात कोणत्या विशेष तरतुदी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरासरी उत्पन्नाचा अंदाजे आकडा…
2024- 25 या आर्थिक वर्षामध्ये एकूण उत्पन्नाचा आकडा 30.80 लाख कोटी रुपये आणि राहू शकतो.

Related Articles

Back to top button