देश
LTT रेल्वे स्टेशनच्या जन आहार कॅन्टीनमध्ये आग, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु

लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या (Lokmanya Tilak Terminus Railway Statio) जन आहार कॅन्टीनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. प्लॅटफॉर्म 1 जवळ ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ही आग लेव्हल 1 ची असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.