खेल

IND vs AUS: भारताची प्रथम फलंदाजी, ऑस्ट्रेलियाच्या संघात हेड परतला, भारताकडून आवेश खान मैदानात

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सूर्याच्या नेतृत्वातील युवा टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. पाच सामन्याच्या टी 20 मालिकेतील तिसरा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया कमबॅक करण्यासाठी मैदानात उतरेल. तर भारतीय संघ मालिका विजयासाठी मैदानात उतरले.

भारताच्या संघात एक बदल

आम्हाला प्रथम फलंदाजीच करायची होती, असे सूर्याने नाणेफेक गमावल्यानंतर सांगितले. त्याशिवाय टीम इंडियात एक बदल करण्यात आल्याचेही सूर्याने सांगितले. मुकेश कुमार तिसऱ्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्याच्याजागी आवेश खान याला संधी देण्यात आली आहे. मुकेश कुमार लग्न करत असल्यामुळे तो आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही.

ऑस्ट्रेलियाच्या संघातही बदल –

लागोपाठ दोन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठे बदल करण्यात आले आहे. विश्वचषक विजयाचा हिरो ट्रेविस हेड याला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय Aaron Hardie, बेहरनड्रॉफ आणि केन रिचर्ड्सन यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आलेय. स्टिव्ह स्मिथ, अॅडम झम्पा आणि सीन एबॉट आणि मॅथ्यू शॉर्ट हे आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत.

तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11

सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा.

ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेईंग 11

स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट/ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्कस स्टोयनिस, टिम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (कर्णधार आणि विकेटकीपर), सीन एबॉट, नाथन एलिस, एडम जम्पा, तनवीर सांघा.

Related Articles

Back to top button