देश
पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची; आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

संभाजीनगर पोलिसांनी अमली पदार्थांचं मोठं रॅकेट उघडकीस आणले आहे. उच्चभ्रू घरातील तरुणांना नशेची सवय लावणा-या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. संभाजीनगर पोलिसांनी पुंडलिक नगर भागात तब्बल चार ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी साडे 3 किलो गांजा, एमडी, चरस असा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची आणि तिथं मित्रांसह ड्रग्ज पार्ट्या करायची, अशी माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. अशा पार्ट्यांचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.