देश

आताची मोठी बातमी! टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर मुंबईत हल्ला

मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा (Team India) क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) कारवर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वी शॉने सेल्फी (Selfie) काढायला नकार दिल्याने आठ जणांच्या जमावाने त्याच्या कारवर हल्ला (Attack) केला. मुंबईतल्य ओशिवरा (Oshiwara) परिसरात ही घटना घडली आहे. पृथ्वी शॉ आपल्या मित्राच्या कारमध्ये बसला होता. त्यावेळी तिथे काही जणं आली, त्यांना पृथ्वी शॉबरोबर सेल्फी काढायचा होता. पण पृथ्वी शॉने नकार देताच त्यांनी रागाच्या भरात पृथ्वीच्या कारवर हल्ला केला. या प्रकरणी पृथ्वी शॉने ओशिवरा पोलीस (Oshiwara) स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

बातमी अपडेट होत आहे

Related Articles

Back to top button