देश
“जोडे पुसायची लायकी असणारे…”; उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले “मी सूड घेणार”

जोडे पुसायची लायकी असणारे सरकार चालवत आहेत अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. माझ्या पाठीत खंजीर खुपसला असून, त्याचा सूड मी घेणारच अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी जाहीर इशाराही त्यांनी दिला आहे. मुंबईत आयोजित कामगार सेना सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचं काम गार करणारं सरकार आहे असा टोलाही लगावला आहे. तसंच आपण जो प्रसाद देऊ तो आयुष्यभर लक्षात राहील असाही इशारा दिला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बारसू रिफायनरीवरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण पत्र लिहिलं होतं अशी कबुली यावेळी त्यांनी दिली आहे. दरम्यान तेथील लोकांशी संवाद साधत, त्यांना रोजगार दिला जावा असंही ते म्हणाले आहेत.