bollywoodindiaदेश

बॉलिवूडला अच्छे दिन येणार, रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा टीझर पाहून नेटकरी भारावले

रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

अभिनेता रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘शमशेरा’ चित्रपटाचा टीझर अखेरीस प्रदर्शित झाला आहे. काही तासांमध्येच हा टीझर हजारो लोकांनी पाहिला. टीझरमधील पात्र आणि भव्यदिव्यता पाहून नेटकरी अगदी भारावून गेले आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरणारे चित्रपट आणि त्यामुळे बॉलिवूडमध्ये निर्माण झालेली परिस्थिती आता बदलणार असं नेटकरी बोलत आहेत.

रणबीरची मुख्य भूमिका असलेल्या ‘शमशेरा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा टीझर पाहिला की रणबीरचा कधीही न पाहिलेला अवतार यामध्ये पाहायला मिळतो. हा नवा लूक पाहून रणबीरचं विशेष कौतुक चाहते करत आहेत.

इतकंच नव्हे तर ‘शमशेरा’ ‘केजीएफ २’, ‘आरआरआर’ चित्रपटांना मागे टाकणार असंही बोललं जात आहे. चित्रपटाच्या टीझरवरुनच चित्रपट कसा असणार याचा अंदाज येतो.

‘शमशेरा’चा टीझर पाहून एका युजरने म्हटलं की, ‘अंगावर शहारे आणणारा चित्रपट. हा चित्रपट नक्कीच सुपरहिट ठरणार.’ ‘बॉलिवूडच्या नवीन पर्वाला रणबीर कपूरपासून सुरुवात झाली आहे. सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करणारा चित्रपट.’ असं दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे. चित्रपटाच्या टीझरमधील प्रत्येक सीन पाहून खरंच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई करणार असल्याचं दिसतंय.

Related Articles

Back to top button