Mahakumbh Stampede Live Updates : महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी: क्षमतेहून अधिक भाविकांची गर्दी

संगमनगरी प्रयागराज इथं सध्या सुरुर असणाऱ्या महाकुंभ मेळ्यामध्ये सध्या कोट्यवधी साधूसंत आणि सामान्य नागरिकांनी हजेरी लावलेली असताना इथं एक विपरित प्रकार घडला आहे. मंगळवारी रात्री उशिरानंतर इथं गर्दी वाढत गेली आणि बुधवारी भल्या पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास अमृत स्नानासाठी गंगेच्या विविध घाटांवर जमण्यास सुरुवात केली आणि बॅरिकेट उघडताच इथं जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि भयंकर स्वरुपात चेंगराचेंगरी झाली.
महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत रेकॉर्डब्रेक भाविकांचं स्नान
महाकुंभ मेळ्यामध्ये आतापर्यंत जवळपास 20 कोटी भाविकांनी पवित्र गंगास्नान केल्याची आकडेवारी समोर आली आहे. इथं झालेली गर्दी पाहता आहा हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं यंत्रणांनी हवाई मार्गानं या भागावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीप्रकरणी योगी आदित्यनाथ करणार अधिकाऱ्यांची चौकशी…
आधी उत्तरं द्या… महाकुंभ मेळ्यामध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेमध्ये लक्ष घालत उच्चस्तरीय बैठक बोलावली. सदर प्रकरणात अधिकाऱ्यांची चौकशी करत त्यांना या घटनेवरून प्रश्न विचारत सक्तीची कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
संगम घाटावर गर्दी कमी होईना, सध्या प्रयागराजमध्ये काय परिस्थिती?
ब्रह्म मुहूर्तावर स्नान करण्यासाठी पहाटेच्या वेळी संगम घाटावर प्रचंड गर्दी. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार गर्दी इतकी उसळली की पाहताक्षणी धडकी भरली. आरपीएफ, पोलीस दल आणि इतर यंत्रणांची घटनास्थळी उपस्थिती. गर्दी मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेईना. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
महाकुंभमधील दुर्घटनेनंतर निरंजनी आखाड्याचे प्रमुख कैलाशानंद गिरी महाराज म्हणतात…
निरंजनी आखाड्याचे प्रमुख कैलाशानंद गिरी महाराज म्हणतात, “मोठी आणि अपरिहार्य गर्दी पाहून आखाडा परिषद आणि सर्व आचार्यांनी ठरवले आहे की आज आपण ‘स्नान’ करणार नाही. सर्वसामान्यांना होणाऱ्या समस्या लक्षात ठेवण्याची गरज आहे. भारतीय परंपरा, संत नेहमी सर्वांच्या हितासाठी प्रार्थना करतात आणि कार्य करतात. हे लक्षात घेऊन सर्व आखाड्यांनी सहमती दर्शवली आहे आणि ते घेण्याचे टाळले आहे. आज आपण वसंत पंचमीला पवित्र स्नान करू.