Uncategorized

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : मतभेद मिटले ‘रामायणा’ सजलं, सोनाक्षीच्या हातावर रंगली झहीर इक्बालच्याच नावाची मेहंदी; दोन्ही कुटुंबानी एकत्र येऊन साजरा केला आनंद

मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाचा वाद अखेर मिटला असून दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन लग्नसोहळ्याच्या विधींना सुरु केले आहेत. झहीर (Zaheer Iqbal) आणि सोनाक्षी (Sonakshi Sinha) हे 22 जून रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातं आहे. कारण शत्रुघ्न सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांची पत्नी 23 जूनला होणार्‍या लग्नाच्या पार्टीमध्ये म्हणजेच रिसेप्शनमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे झहीर आणि सोनाक्षीचं लग्न हे 22 जून रोजी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्यासाठी त्यांचं रामायणा घरालाही विद्युत रोषणाई करण्यात आलीये.

तसेच सोनाक्षीच्या मेहंदीचे देखील फोटो समोर आले आहेत. यामध्ये दोन्ही कुटुंब अगदी आनंदात दिसतायत. तसेच शत्रुघ्न सिन्हा आणि झहीर इक्बाल यांची देखील भेट झाली. त्यामुळे सध्या सिन्हा यांच्या घरी त्यांच्या लेकीच्या लग्नाची लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी काय म्हटलं?
गुरुवार 20 जून रोजी रात्री सिन्हा आणि इक्बाल कुटुंब भेटले. त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी झहीरला देखील मिठी मारली. त्यामुळे या दोन्ही कुटुंबातले वाद मिटले असल्याचं म्हटलं जातंय. त्यानंतर टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं की, मी आधी जेव्हा तुमच्याशी बोललो त्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आता लग्न घरं म्हटलं की, बऱ्याच गोष्टी सारख्या बदलत असतात. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाही, कारण ही कौटुंबिक गोष्ट आहे. पण काही गोष्टी मी स्वत:हून सांगणं गरजेचं आहे. मी आणि माझी बायको 23 जूनला होणाऱ्या सेलीब्रेशनमध्ये सहभागी होणार आहोत. हे लग्न नाही, लग्नाचं रिसेप्शन असणार आहे. त्यामध्ये आम्ही सर्वजण उपस्थित राहणार आहोत.

सोनाक्षी आणि जहीर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने ‘डबल XL’ नामक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं प्रेम जगजाहीर केलं. दोघांनी आजवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेले आहेत.

Related Articles

Back to top button