देश

ऋषभ-पुजाराचं अर्धशतक, इंग्लंडसमोर 378 धावांच लक्ष्य

इंग्लंडविरूद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्याच टीम इंडियाचा दुसरा डाव 245 धावावर आटोपला आहे. दुसऱ्या डावात पुजारा आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या बळावर टीम इंडिया 245 धावांचा टप्पा गाठू शकली. त्यामुळे टीम इंडियाने 377 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडला आता या धावा पुर्ण करून सामन्य़ावर विजय मिळवता येणार आहे.

भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. या धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात केवळ 284 धावाच करू शकला. यामुळे टीम इंडियाला 132 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. त्यानंतर टीम इंडियाचा दुसरा डाव सुरु झाला.मात्र भारताची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाचे सहा खेळाडू तर 20 धावांच्या आतचं आऊट झाले. तर पुजाराने 66 आणि ऋषभ पंतने सर्वांधिक 57 धावा केल्या आहेत. या बळावर भारताने दुसरा डाव 245 धावावर आटोपला आहे. त्यामुळे टीम इंडियाने 377 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडला आता विजयासाठी 378 धावांची गरज आहे.

Related Articles

Back to top button