देश

अफगाणिस्तानमध्ये गुरुद्वारावर मोठा हल्ला; अनेक जण मृत्युमुखी पडल्याची भीती

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुल शहरातील एका शीख गुरुद्वाऱ्यावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात काही लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुद्वाऱ्याच्या आसपासच्या परिसरात गोळीबार करण्यात आला असून स्फोटही घडवून आणल्याची माहिती आहे. दोन हल्लेखोर अजूनही गुरूद्वारात असल्याचं सांगितलं जात आहे.

अफगाणी पत्रकार बिलाल सरवरी यांनी या हल्ल्याबाबतची माहिती दिली आहे. गुरूद्वारात सर्वात आधी गेटच्या बाहेर स्फोट झाला. त्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आतमध्येही स्फोट झाले असून सुरक्षारक्षकांकडून हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं बिलाल सरवरी यांनी म्हटलं आहे.

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर गुरूद्वारा

तालिबानकडून अद्याप या हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र आता ज्या गुरूद्वाऱ्यावर हल्ला झाला आहे, तिथं यापूर्वीही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तेव्हा हल्लेखोरांना अटक केल्याचा दावा तालिबानकडून करण्यात आला होता. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या परिसरात शीख समुदाय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये शीख समुदायाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Related Articles

Back to top button