देश
मध्य रेल्वे मार्गावरच्या लोकलमध्ये अचानक धूर, प्रवाशांचा आरडाओरडा… प्लॅटफॉर्मवर एकच गर्दी

मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ऐन घरी परतण्याच्यावेळी पुन्हा एकदा त्रासाला सामोरं जावं लागलंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून 4:30 वाजातच्या लोकलमध्ये (Railway Local) अचानक धूर आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. भायखळा स्टेशनवर लोकल थांबलेली असतांना अचानक लोकल ट्रेनमध्ये धूर पसरला. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये आरडाओरडा सुरू झाला आणि भीतीचे वातावरण निर्माण झालं. लोकलमध्ये असलेल्या प्रवाशी भायखळा स्टेशन वर उतरले. प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. यामुळे भायखळा प्लॅटफॉर्म एकच गर्दी दिसून आली. ही लोकल सीएसएमटीवरुन ठाण्याला जात होती.