IPL 2022 : 6, 6, 4, 6 राशिद खाननं बॉलनं नाही तर बॅटनं फिरवली मॅच, हेलिकॉप्टर शॉट्सनं केलं CSK ला पराभूत!
मुंबई, 18 एप्रिल : अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खान (Rashid Khan) हा त्याच्या भेदक लेग स्पिन बॉलिंगसाठी जगभर प्रसिद्ध आहे. चार ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी टीमला जखडून ठेवण्याबरोबर विकेट्स घेण्याचं कौशल्यही राशिदकडं आहे. त्यामुळेच तो जगभरातील टी20 लीगमध्ये सर्वाधिक मागणी असलेला खेळाडू आहे. गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) राशिदला आयपीएल ऑक्शनपूर्वीच 15 कोटींना करारबद्ध केले होते.
गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध अनफिट असल्यानं खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये राशिदनं टीमची कॅप्टनसी केली. राशिदला बॉलनं फार कमाल करता आली नाही. त्यानं ती कसर बॅटनं भरून काढली. चेन्नईनं दिलेल्या 170 रनचा पाठलाग करताना गुजरातची स्थिती 13 व्या ओव्हरमध्ये 5 आऊट 87 झाली होती.
या अवघड परिस्थितीमध्ये राशिदनं डेव्हिड मिलरच्या साथीनं गुजरातला संकटातून बाहेर काढलं. या दोघांनी 6 विकेट्ससाठी 70 रनची भागिदारी केली. त्यामध्ये जास्त वाटा राशिदचाच होता. गुजरातला शेवटच्या 3 ओव्हरमध्ये विजयासाठी 48 रन हवे होते. त्यावेळी राशिदनं ख्रिस जॉर्डनच्या (Chris Jordan) एकाच ओव्हरमध्ये 3 सिक्स आणि 1 फोर लगावले. राशिदनं या ओव्हरमध्ये त्याच्या ठेवणीतले हेलिकॉप्टर शॉट्स लगावत 25 रन काढले.