गुरुवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. पण आज मात्र सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात काल सोनं-चांदीच्या दराने उसळी घेतली होती. तर, देशांतर्गंत बाजारातही काल सोनं घसरलं होतं. आज मात्र सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. आज 24 कॅरेट सोनं तब्बल 1 हजार रुपयांनी महागलं आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
22 एप्रिल रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर जवळपास एक लाख रुपयांवर पोहोचला होता. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. एक किलो चांदीचा भाव 2,297 रुपयांनी कमी होऊन 94,103 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. सुरुवातीला चांदीचा दर 96,400 रुपये प्रति किलो इतका होता. सोन्याच्या दरात होणारी घसरणीचे कारण म्हणजे अमिरेका आणि चीन यांच्याती व्यापारामुळं तणाव कमी होण्यास मदत मिळाली
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळं प्रतितोळा सोनं 87,200 रुपयांवर स्थिरावलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 900 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 71,350 रुपयांवर स्थिरावलं आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 87,200 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 95,130 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 71,350रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,720रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,513 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,135 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 69,760 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 76,104 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 57,080 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 87,200 रुपये
24 कॅरेट-95,130 रुपये
18 कॅरेट- 71,350रुपये