देश
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर RBI चा मोठा निर्णय; रेपो रेटबाबत घोषणा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या पतधोरण समितीच्या बैठकीत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केले. MPCने पॉलिसी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4 टक्क्यांवर कायम आहे. मध्यवर्ती बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करण्याची ही सलग 10वी वेळ आहे. यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने 22 मे 2020 रोजी रेपो दरात शेवटचा बदल केला होता.
रिव्हर्स रेपो दरात वाढ
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, रिव्हर्स रेपो दरात 0.40% वाढ करण्यात आली आहे. आता ते 3.75% पर्यंत वाढले आहे. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट (MSFR) आणि बँक रेट 4.25 टक्के असेल.