देश

Maratha Reservation Row: मराठा आरक्षण विरोधी डॉक्टरला केले लक्ष्य; कोल्हापुरात हॉस्पिटलची तोडफोड

मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेणारे डॉ. तन्मय व्होरा यांच्या कोल्हापूर येथील सूर्या हॉस्पिटलची आज ‘ मराठा क्रांती मोर्चा ‘च्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यामुळे तिथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तसेच व्होरा यांनी माफी मागितल्यानंतर तणाव निवळला. ( Maratha Kranti Morcha Targets Tanmay Vora )

एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सूर्या हॉस्पिटलवर धडक दिली. तिथे जाब विचारत हॉस्पिटलच्या नामफलकाची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. अचानक कार्यकर्त्यांनी हे हिंसक आंदोलन केल्याने गोंधळ उडाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने येऊन कार्यकर्त्यांना शांत केले. डॉ. व्होरा हे ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन‘ या मारवाडी समाजातील संस्थेचे संचालक आहेत. या संस्थेने मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनात दिलीप पाटील, सचिन तोडकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता. व्होरा यांनी माफी मागितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे दसरा चौक परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Back to top button