politicsदेश

विधानसभा अध्यक्षांची लवकच निवडणूक होणार; कॉंग्रेसकडून या नेत्यांची नावं चर्चेत

राज्याचे विधानसभा अध्यक्षपद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर यापदावर अद्यापतरी नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 9 मार्च रोजी घेण्यात यावी याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे करणार आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. यासंबधीची विनंती महाविकास आघाडी राज्यपालांना करणार आहे. कॉंग्रेस पक्षाकडून ही अध्यक्षपदाची निवडणूक तत्काळ घ्यावी याबाबत आग्रह आहे.

अध्यक्षपदाच्या  निवडणुकीसाठी  कॉंग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे यांची नावं आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button