देश

आनंदोत्सव महागात पडला! चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरिल चेंगराचेंगरी प्रकरणी RCB आणि KSCA विरुद्ध FIR दाखल

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) आयपीएलमधील पहिला विजयानंतरचा आनंद  काहीच काळ राहिला असं म्हणावं लागेल. कारण रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला विजय महागात पडला आहे. विजय साजरा करताना एक मोठी दुर्घटना घडली. विजयाच्या जल्लोषादरम्यान  चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाला आहे. आता या घटनेनंतर बेंगळुरू पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) फ्रँचायझी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघ (KSCA) आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी DNA एंटरटेनमेंट यांच्याविरुद्ध गंभीर आरोपांसह FIR दाखल केली आहे.

न्हवती कोणतीही अधिकृत परवानगी

ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी आपल्या FIR मध्ये नमूद केलं आहे की, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला स्टेडियममध्ये कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेण्याची अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीदेखील संघ व्यवस्थापन, स्टेडियमचे प्रशासन आणि आयोजकांनी मिळून एवढा मोठा कार्यक्रम ठेवला आणि त्यामुळे खूप गर्दी निर्माण झाली. ही गर्दी काही काळातच नियंत्रणाबाहेर गेली आणि दुर्घटना घडली.

FIR मध्ये गंभीर कलमांचा समावेश

कब्बन पार्क डिव्हिजनचे पोलीस निरीक्षक गिरीश ए.के. यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या या एफआयआरमध्ये भारतीय दंड विधानाच्या 6 गंभीर कलमांचा समावेश आहे. 

कलम 105 (गैर इरादतन हत्या)

कलम 115 (जाणीवपूर्वक इजा करणे)

कलम 118 (घातक शस्त्र वापरून गंभीर दुखापत करणे)

कलम 125 (इतरांचे प्राण किंवा सुरक्षिततेला धोका पोहोचवणे)

कलम 132 (शासकीय कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणे)

आणि कलम 190 (बेकायदेशीर जमाव)

Related Articles

Back to top button