देश

मुंबईत माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, दाम्पत्याचा मृत्यू, तिघे जखमी, ग्रँट रोडमधील चाळीत थरार

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, मुंबईतील ग्रँट रोड येथे एका माथेफिरुने एकाचवेळी पाच जणांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पती-पत्नीचा मृत्यू झालाय तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जयेंद्र मेस्त्री आणि निला मेस्त्री अशी मृतांची नाव आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वतःचे कुटुंब सोडून गेल्यामुळे आरोपीने मानसिक तणावात आणि रागाच्या भरात हा हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. मयत पती-पत्नी हे आरोपीच्या शेजारीच राहत होते आणि त्यांच्यामुळेच आपले स्वत:चे कुटुंब सोडून गेलं या तणावात आरोपीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, उर्वरीत तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डी.बी मार्ग पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

Related Articles

Back to top button