देश

ST bus strike : महामंडळाचा मोठा दणका, 238 एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई

राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरु आहेत. संप मागे घ्या, असे आवाहन करुनही कर्मचारी ऐकत नसल्याने एसटी महामंडळाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात 238 एसटी कर्मचा-यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.  ( Maharashtra ST bus Employee strike – Services of 238 daily wage workers terminated)

मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांचं जागर गोंधळ आंदोलन सुरु आहे. मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना बाहेरच रोखले गेले आहे. दरम्यान, एसटीतील 238 कर्मचार्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित कर्मचार्‍यांवरही सेवा समाप्तीची कारवाई सुरू राहणार आहे. मात्र कर्मचारी आंदोलनावर ठाम आहे.

राज्यातून आझाद मैदानातल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कर्मचारी दाखल होत आहेत. त्यांना अडवलं जातंय. मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनात सहभागी  होण्यासाठी जाणाऱ्या मनमाड आगारातील 21 एसटी कर्मचाऱ्यांना मनमाड पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्रा या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

 

मुंबईत आझाद मैदानात आंदोलनासाठी निघालेल्या मनमाडच्या 21 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र काही वेळ ताब्यात ठेवल्यावरनंतर समज देऊन या आंदोलकांना सोडून देण्यात आलं. मनमाडहुन पंचवटी एक्स्प्रेसने हे आंदोलक मुंबईकडे निघाले होते. सकाळीच मनमाड रेल्वे स्थानकातच पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते.

Related Articles

Back to top button