देश

Live: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक सुरु

करोनाचे थैमान रोखण्यासाठी राज्यभर कठोर निर्बंध लागू केल्यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यत येत नसल्यानं आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. यावेळी राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याबाबत गांभीर्यानं विचार केला जाणार असल्याची चर्चा आहे. (CM Uddhav Thackeray meeting with all party leaders)

या बैठकीत महाविकास आघाडीतील मंत्र्यांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

– राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेदेखील बैठकीला उपस्थित

– मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक सुरु

– रुग्णसंख्या दहा लाखांवर गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, त्यामुळं लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाणार. या बैठकीत विरोधी पक्षाचेही मत विचारात घेतले जाणारः विजय वडेट्टीवार

– करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कटू निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाहीः बाळासाहेब थोरात

– व्यापाऱ्यांच्या भूमिकेबाबत आज बैठकीत चर्चा होणारः अजित पवार

– सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

– राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांचा लॉकडाउनबाबत चर्चा होणार असल्याची माहिती

Related Articles

Back to top button