देश

Single Use Plastic इस तारीख से होने जा रही है Ban, देखिये कौन सी चीजें होंगी बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करीत भाषण केले. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. तसेच देशाच्या विकासासाठी भविष्यातील योजनांचीही माहिती लोकांना दिली. यामध्ये पीएम गती शक्ती योजनेची चर्चा देशात सुरू आहे.

देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकारच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. गती शक्ती योजना लाखो युवकांना रोजगार देईल. असे पंतप्रधान मोदी यांनी आज भाषणात सांगितले. 21 व्या शतकातील भारताला नव्या उंचाईवर पोहचवण्यासाठी भारतातील लोकांच्या सामार्थ्याचा पूर्ण आणि योग्य वापर करणे ही काळाची गरज आहे. समाजातील मागे पडलेल्या वर्गाचा हात धरून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. असंही मोदी यावेळी म्हणाले.

देश जोडण्यासाठी मिळणार मदत
पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये वेगवेगळे काम करण्याला आता समाप्त करण्याची वेळ आली आहे. आता संपूर्ण देशाला मल्टी मॉडल संपर्क पायाभूत सुविधेसोबत जोडण्याची मोठी योजना तयार करण्यात आली आहे. PM मोदी यांनी म्हटले की, गती शक्ती योजनाअंतर्गत देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध होतील.

Related Articles

Back to top button