देश
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार

राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी.सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याने राज्यमंत्रीमंडळ विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. येत्या 10 दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. त्यानंतरच होणार मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे सांगण्यात येत आहे.