
सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोनं दिवसेंदिवस उच्चांकी दर गाठत आहे. आज पुन्हा एकदा सोनं महागलं आहे. तर, चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. चांदी MCX वर 356 रुपयांची वाढ झाली असून प्रतिकिलो 95130 रुपयांवर ट्रेड करतेय. आंतरराष्ट्रीय बाजातात कॉमेक्सवरदेखील सोनं $ 3,300 वर पोहोचलं आहे. तर अमेरिकन मार्केटमध्ये स्पॉट गोल्ड $3,281 वर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात सोन्याची किंमत 6 टक्क्यांनी वधारली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणारी अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुक म्हणून सोन्याकडे वाढणारा कल यामुळं सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. अमेरिकेत डॉनल्ड ट्रप यांनी घेतलेल्या निर्णयामुळं गुंतवणुकदारांना सतर्क केले आहे. ट्रेड वॉर, राजकीय तणाव आणि जागतिक मंदी यासगळ्या कारणामुळंही बाजारपेठेत अस्थिरता आहे.
आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 950 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 88,150 रुपयांवर पोहोचलं आहे. तर एक ग्रॅम सोन्याचे दर 8,815 रुपयांवर स्थिरावले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 990 रुपयांनी वधारले असून 96,170 रुपये प्रतितोळा सोन्याची आजची किंमत आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 780 रुपयांनी महागले असून 72, 130 रुपये प्रतितोळावर स्थिरावले आहे.
काय आहेत सोन्याचे दर?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 88,150 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 96,170 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 72,130 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,815 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,617 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,213रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 70,520 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 76,936रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 57,704 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट-88,150 रुपये
24 कॅरेट- 96,170 रुपये
18 कॅरेट- 72,130 रुपये